नव्या 'ब्राह्मोस'च्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- भारत आणि रशिया लवकरच संयुक्तपणे 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे नव्या 'जनरेशन'चे ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे. 

नवी दिल्ली- भारत आणि रशिया लवकरच संयुक्तपणे 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे नव्या 'जनरेशन'चे ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे. 

MTCR चा फायदा 
भारत यावर्षी जून महिन्यात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियामक संस्थेचा (MTCR) सदस्य बनला आहे. या सदस्यत्वाचा परिणाम म्हणूनच रशिया भारतासोबत मिळून हे क्षेपणास्त्र बनविणार असल्याचे एक इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. MTCR गटाच्या नियमांनुसार यामधील सदस्य देश गटाबाहेरील देशांना 300 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये भागीदारी करू शकत नाहीत, किंवा विकू शकत नाहीत. त्यामुळे भारताला या सदस्यत्वाचा फायदा झाला आहे. 

भारताकडे सध्या असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता 300 किलोमीटरपर्यंतच आहे. या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या आतील प्रदेशांना लक्ष्य करणे कठीण आहे. भारताकडे 'ब्राह्मोस'पेक्षा अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रेही आहेत, परंतु ज्यावर हल्ला करायचा आहे त्या लक्ष्याच्या भोवती कितीही सुरक्षा असेल तरी त्यावर नेमका निशाणा साधणे ही ब्राह्मोसचे वैशिष्ट्य आहे. जर पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर नव्या जनरेशनचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र 'गेमचेंजर' ठरू शकते. 
 

Web Title: india russia to develop 600 km range new generation brahmos missile that can cover whole pakistan