कुलभूषण जाधव यांना तातडीने सोडा!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानने जाधव यांची लवकरात लवकर मुक्तता करून त्यांना भारताच्या सुपूर्त करावे असे आवाहन राष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत केलेल्या निवेदनाद्वारे केले.

नवी दिल्ली : पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पकडलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे  संपूर्ण निर्दोष असल्याचा भारताचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा सिध्द झाल्याचे भारताने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानने जाधव यांची लवकरात लवकर मुक्तता करून त्यांना भारताच्या सुपूर्त करावे असे आवाहन राष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत केलेल्या निवेदनाद्वारे केले.

जयशंकर यांनी आज सकाळी सर्वप्रथम राज्यसभेत निवेदन केले. त्यानंतर उपराष्ट्रपती व  राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही भारताच्या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जाधव यांच्या सुखद त्याची आशा व्यक्त केली. सर्वपक्षीय सदस्यांनी बाकांच्या गजरात जाधव यांच्या सुटके बद्दल प्रकरणात भारताची बाजू यशस्वीपणे मांडणारे विधिज्ञ हरीश साळवे वरिष्ठ सभागृहाने अभिनंदन केले.

जयशंकर यांनी प्रथम राज्यसभा आणि नंतर लोकसभेत केलेल्या निवेदनात सांगितले की या खटल्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात पंधरा विरुद्ध एक अशा बहुमताने भारताचा दावा सिद्ध झाला. कुलभूषण जाधव यांना तातडीने भारतीय वकिलाची मदत  देण्याचाही आदेश  न्यायालयाने पाकिस्तानला दिला.

2017 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये भारताच्या या सुपुत्राला प्रतिबद्धता अधोरेखित केली होती कालचा निकाल केवळ भारताचीच बाजू बळकट करणारा नसून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणाऱ्या आणि त्यावर विश्वास असणार्‍या सर्वांसाठी तो महत्त्वाचा आहे कुलभूषण निर्दोष असून त्यांच्याकडून कबुली जवाब घेण्यात आला. यावेळी जयशंकर यांच्या कुटुंबियांचे व त्यांनी या कठीण काळात दाखविलेल्या धाडसाचेही जयशंकर यांनी कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India s appeal to quit Kulbhushan Jadhav promptly