भारतातला पहिला दहशतवादी हिंदू : कमल हसन

kamal hasan
kamal hasan

चेन्नई : 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. राष्ट्रपीता महात्मा गांधींना मारणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी व्यक्त केले. तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील अरवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागांत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. 

'दहशतवादाला धर्म नसतो. पण जहाल हिंदुत्वाचा उपयोग नाही. कोणत्याही प्रचारचा दहशतवाद हा चुकीचाच आहे. तो हिंदू असो किंवा मुस्लिम. कोणताही धर्म हा दहशतवादाला थारा देत नाही, इथे उपस्थित असलेला मुस्लिमही हे मान्य करेल व दहशतवादाला जुमानणार नाही, तर कुराणावर हात ठेवून शपथ घेतात, त्यांनाही प्रेमच हवे आहे,' असेही कमल हसन यांनी सांगितले.

'हे मी केवळ हा मुस्लिमांची संख्या असणारा भाग आहे म्हणून म्हणत नाही, पण भाजप माझ्यावर हिंदुत्वावारून टीका करत आहे म्हणून बोलत आहे,' असेही त्यांनी यावेळी सांगितले. 19 मे ला येथील मतदान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com