मोदींच्या नेतृत्त्वात भारत सुरक्षित : अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

'आजचा हल्ला हा भारताची इच्छाशक्ती व संकल्पाचे दर्शन आहे, हा नवीन भारत कोणत्याही प्रकारचा दहशवाद सहन करणार नाही. तसेच दहशतवादाला मदत करणाऱ्यांना माफ करणार नाही.' अशा आशयाचेही ट्विट शहा यांनी आज केले.

नवी दिल्ली : 'भारतीय लष्कराला त्यांच्या शौऱ्यासाठी अभिनंदन, त्यांना सलाम... आजच्या हवाई दलाच्या कारवाईने पुन्हा सिद्ध केले की भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत व निर्णायक नेतृत्वात सुरक्षित आहे' असे ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केले आहे. 

'आजचा हल्ला हा भारताची इच्छाशक्ती व संकल्पाचे दर्शन आहे, हा नवीन भारत कोणत्याही प्रकारचा दहशवाद सहन करणार नाही. तसेच दहशतवादाला मदत करणाऱ्यांना माफ करणार नाही.' अशा आशयाचेही ट्विट शहा यांनी आज केले.

काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनीच पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या हल्ल्यामुळे भारतीय सैन्यदलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India in secure under Narendra Modi s leadership says Amit Shah