देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ९० टक्के संख्या ही फक्त आठ राज्यांमधील; कोणती आहेत राज्ये पहा

पीटीआय
शुक्रवार, 10 जुलै 2020

देशातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ९० टक्के संख्या ही फक्त आठ राज्यांमधील आहे. त्यातही या राज्यांमधील ४९ जिल्ह्यांतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंत्री गटाने दिली.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ९० टक्के संख्या ही फक्त आठ राज्यांमधील आहे. त्यातही या राज्यांमधील ४९ जिल्ह्यांतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंत्री गटाने दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत मंत्री गटाची १८ वी बैठक झाली. या वेळी राज्य आणि जिल्हानिहाय कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. 

Image may contain: text that says "देशात ८६ टक्के मृत्यूदर असलेली राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल देशात ९० टक्के रुग्णसंख्या असलेली राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाड, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ३ हजार ९१४ देशभरातील उपचार लाख ४२ हजार ४१५ ऑक्सिजन सुविधेच्या खाटा ३ लाख ७७ हजार ७३७ खाटा २० हजार व्हेंटिलेरच्या सुविधा कोटी २० लाख पीपीई किटचे वाटप हजार ८२० आयसीयू सुविधेच्या खाटा ६. कोटी १२ लाख हायड्रोक्लोरोक्विन गोळ्यांचे वाटप २१ कोटी ३० लाख देशभरात वाटप झालेले एन -९५ मास्क"

जगभरातील सर्वाधिक कोरोनाप्रभावित ५ देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. १० लोकांमागे भारतात ५३८ कोरोनाचे रुग्ण आहेत, मृत्यू १५ आहेत. जगातील रुग्णांचे हेच प्रमाण १४५३, तर मृत्यू ६८ आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विश्‍वासात घेऊन आणि मार्गदर्शनाने कोरोनाला रोखण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाची चाचणी आणि त्याला तत्काळ उपचार मिळणे हेच आमचे प्रथम प्राधान्य राहील.
- हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India State Corona Patient Increase