भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली.

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली.

रणबीरसिंग म्हणाले, ‘‘सीमेजवळ दहशतवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. माझी याबाबत पाकिस्तानच्या महासंचालकांशी चर्चा झाली असून, त्यांना या कारवाईची माहिती दिली आहे. सीमेवरून सतत होत असलेली घुसखोरी हे काळजी करण्यासारखे आहे. पाकविरोधात भारताकडे अनेक पुरावे आहेत. जानेवारी 2004 मध्ये पाकिस्तानने आश्वासन दिले होते की दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही. पण, पाकिस्तानकडून हे आश्वासन पाळण्यात येत नाही. जम्मू काश्मीरमध्ये सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. पुँछ आणि उरी याची उदाहरणे आहेत. भारतीय जवानांनी 20 घुसखोरीचे कट उधळून लावले आहेत. आम्ही सीमेवरून घुसखोरी होऊ देणार नाही. पाकिस्तानी सैन्याने आमची मदत करावी, तरच आपण दहशतवादी कटांना उधळून लावू. आम्ही उरी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे डीएनएन देण्याची तयारी पाकिस्तानला दर्शविली आहे.‘‘

Web Title: India strikes in PoK to hunt down terrorists