ओडिशातून पृथ्वी-2 चे यशस्वी प्रक्षेपण

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बालासोर - देशात प्रथमच निर्माण झालेले बॅलेस्टीक मिसाईल श्रेणीतील "पृथ्वी-2' या क्षेपणास्त्राची चाचणी आज बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथे यशस्वीरीत्या पार पडली. आज सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी एका मोबाईल लॉंचरच्या साह्याने या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.

प्रक्षेपणाच्या वेळी क्षेपणास्त्रावर डीआरडीओ रडार व इलेक्‍ट्रो ऑप्टिकल ट्रकिंग यंत्रणेद्वारे नजर ठेवण्यात आली होती. यापूर्वी 16 फेब्रुवारी 2016 मध्ये क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. तसेच, 12 ऑक्‍टोबर 2009 मध्ये घेतलेल्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

क्षेपणास्त्रात लिक्विड प्रोपल्शन इंजिन असून त्यामुळे योग्य वेग पकडण्यास मदत मिळते. तसेच, अत्याधुनिक मार्गदर्शक प्रणालीमुळे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र 2003 मध्ये लष्करात दाखल झाले होते. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी निर्मितीनंतर भारत कोणत्याही आक्रमणास तोंड देण्यास सज्ज झाला आहे.

पृथ्वी-2 ची वैशिष्टे
- देशात निर्माण झालेले पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
- जमिनीवरून व जमिनीवर मारा करण्याची क्षमता
- 350 किलोमीटर दूर लक्ष्याचा अचूक वेध
- हजार किलो वजनापर्यंतची परंपरागत व अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता
- लिक्विड व सॉलिड दोन्ही इंधनांवर कार्यान्वित
- 443 सेकंदात 43.5 किमी अंतर कापणार

पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी
जमिनीवरून जमिनीवर 350 किलोमीटरच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता राखणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-2 चे सोमवारी ओडिशातील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
लांबी - 8.56 मीटर : व्यास :110 सेंटिमीटर, क्षमता : 500 ते 1000 किलो. प्रज्वलन : एक टप्प्यात, दोन इंजिन-द्रवरूप, पल्ला: 350 किलोमीटर
प्रक्षेपण : मोबाईल लॉचिंग, युद्धसामग्री : पारंपरिक आणि अण्वस्त्रवाहू
भारतीय लष्करात समावेश : 2003, यापूर्वी घेतलेली चाचणी : 12 ऑक्‍टोबर 2009

टप्प्यातील अंदाजित परिसर
इस्लामाबाद
पाकिस्तान
कराची
नवी दिल्ली
भारत
कोलकाता
भुवनेश्‍वर
मुंबई
चेन्नई
बंगालचा उपसागर
चाचणीचे ठिकाण
ओडिशातील चंडीपूर येथे 21 नोव्हेंबर 2016 रोजी पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी

Web Title: India Successfully Conducts Twin Trial of Prithvi-11 Missile