"अग्नी-5'ची यशस्वी चाचणी 

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

भारताने आज स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रक्षम "अग्नी-5' या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची मारक टप्पा पाच हजार कि.मी.पर्यंत आहे. बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरील तळावरून सकाळी 9.48 वाजता ही चाचणी झाली.

बालासोर (ओडिशा) : भारताने आज स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रक्षम "अग्नी-5' या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची मारक टप्पा पाच हजार कि.मी.पर्यंत आहे. बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरील तळावरून सकाळी 9.48 वाजता ही चाचणी झाली.

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या "अग्नी-5'ची ही सहावी चाचणी होती. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने त्याच्या क्षमतेइतके सर्व अंतर यशस्वीरीत्या पार केल्याचे सूत्रांनी सांगितले. "अग्नी' मालिकेतील "अग्नी-5' हे सर्वांत आधुनिक क्षेपणास्त्र आहे. 

Web Title: India Successfully Test-Fires Nuclear Capable Agni-5 Ballistic Missile