पाकिस्तानच्या उरात भरणार धडकी; भारत घेणार 'के-4' मिसाईलची चाचणी

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारताला शत्रुराष्ट्रांच्या पाणबुड्यांचा सहज वेध घेता येईल.

भुवनेश्‍वर : पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना भारत याच आठवड्यामध्ये दीर्घ पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे.

- Breaking : थायलंडमध्ये दहशतवादी हल्ला; 15 नागरिक ठार

'के-4' असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, त्याची मारकक्षमता साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत समुद्रातूनच पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र डागले जाण्याची शक्‍यता आहे.

- सत्ता स्थापनेसाठी भाजप राज्यपालांना भेटणार

या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारताला शत्रुराष्ट्रांच्या पाणबुड्यांचा सहज वेध घेता येईल. संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ) ही संस्था या क्षेपणास्त्र प्रणालीच्या विकासावर काम करीत असून, अरिहंत श्रेणीतील आण्विक पाणबुड्यांवर हे क्षेपणास्त्र बसविण्यात येईल.

- 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, 'ती' गोड बातमी मुंनगंटीवार देतील' - संजय राऊत

विशेष म्हणजे, याच श्रेणीतील पाणबुड्यांवर भारताच्या सागरी संरक्षणाची भिस्त अवलंबून आहे. प्रत्यक्ष क्षेपणास्त्राबरोबरच त्याच्याशी संबंधित अत्याधुनिक अशा अन्य यंत्रणेचीही चाचणी घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India to test fire 3500 km range nuclear capable K 4 missile