स्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

बालासोर (ओडिशा) : समद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रुच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने आज (बुधवार) यशस्वीपणे चाचणी घेतली. 

देशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे. भारताने एका महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली. 

'क्षेपणास्त्राचे उड्डाण झाल्यानंतर लक्ष्यभेदी यंत्रणेची विविध परिमाणे तपासण्यासाठी हे प्रक्षेपक चाचणी करण्यात आली,' असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही कमी उंचीवरील चाचणी होती असेही त्यांनी सांगितले. 

येथून जवळ असलेल्या चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (ITR) प्रक्षेपक केंद्र क्रमांक तीनमधून एक पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवी लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली. 
 
Web Title: india test-fires indigenous supersonic interceptor missile