अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र "अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.

बालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र "अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.

संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आणि स्वदेशात विकसित झालेल्या या क्षेपणास्त्राची सातवी चाचणी आहे. "अग्नी-5'मध्ये तीन टप्प्यांत मारा करण्याची क्षमता आहे. 17 मीटर लांबीचे आणि दोन मीटर रुंदीचे असणाऱ्या अग्नी-5मध्ये दीड टन वजनाएवढे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी सोमवारी दुपारी बंगालच्या खाडीत डॉ. कलाम बेटावर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर)च्या लॉंचपॅड संख्या चारपैकी एका मोबाईल लॉंचरने घेण्यात आली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेताना त्याच्या हालचालीवर रडार आणि परीक्षण स्थानकाच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आले. अग्नी क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये दुसरी, 31 जानेवारी 2015 मध्ये तिसरी, 26 डिसेंबर 2016 रोजी चौथी चाचणी घेण्यात आली. पाचवी चाचणी 18 जानेवारी 2018 मध्ये घेतली होती. शेवटची चाचणी 3 जून 2018 रोजी घेतली. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

क्षेपणास्त्र....... माऱ्याची क्षमता (कि.मी.मध्ये) 
अग्नी- 1 : 700 
अग्नी- 2 : 2000 
अग्नी- 3 : 2500 
अग्नी- 4 : 3500 
 

Web Title: India test fires nuclear capable Agni-5 missile 2nd test in six months