Rain : देशभरात दिवसभरात पावसाची स्थिती काय होती? जाणून घ्या अपडेट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain  Update

Rain : देशभरात दिवसभरात पावसाची स्थिती काय होती? जाणून घ्या अपडेट्स

मध्यप्रदेश राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.

विदिशा आणि बालाघाट जिल्ह्यातून आडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. आणि मदतीसाठी छावण्या उभारल्या जात आहेत.

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस

सुरतमधील मिठी नदीच्या सभोवतालच्या सखल भागात पूरसदृश परिस्थिती झाली आहे. तेथील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

मुंबईसह उपनगरांमद्धे पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा

सकाळपासून मुंबईला पावसाने झोडपून काढल आहे. मुंबईसह उपनगरांमद्धे पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मोठ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. हिंदमाता परिसरातही पाणी साचलं आहे. अंधेरी, विलेपार्ले तसेच जोगेश्वरी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

कुलूच्या सोलांग येथील पुरात बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह सापडले

कुलूच्या सोलांग नाल्यात काल अचानक आलेल्या पुरामुळे दोन जण बेपत्ता झाले होते. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने थांबलेले शोध आणि बचाव कार्य आज सकाळी पुन्हा सुरू झाले. त्यानंतर घटनास्थळावरून एक मृतदेह सापडला, तर बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाच्या मृतदेहाचा काही भाग नदीतून सापडला. एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, प्रशासनाच्या टीमसह सुमारे 100 लोक त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस चालू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

भंडारा - गडचिरोलीचा संपर्क तुटला

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीततील विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर या पुलांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे, तर राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे.

मुंबई उपनगरांमद्धे पावसाला सुरवात

मुंबई उपनगरांमद्धे पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. मुंबईत मध्र्यरात्रीपासून रिमझिम पाऊस चालू आहे. मुंबईत काही भागात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरु असल्यानं वातावरण थंड आहे. आज सकाळीही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे.

धरणांमधून विसर्ग सुरु

पावसामुळे नंदुरबार, भंडारा,गोंदिया, वर्धा, पुणे ठिकाणची सर्व धरणे भरली. सर्व धरणातून विसर्ग सुरू, तर नदी धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरु

महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे उजनी आणि वीर धरण ओव्हरफ्लो झाले त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंढरपूर शहरासह नदीच्या शेजारील गावांना पुराचा धोका वाढला आहे.

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात परीक्षा रद्द

राज्याच्या विविध भागात चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या सर्व ठिकाणी पावसामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

गोंदियामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी

गोंदिया शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठून राहील आहे. बांध, तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग आणि गोंदिया-नागपूर मार्गावर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गोंदिया जिल्यात मागील 36 तासा पासून सुरु असेलल्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गोंदिया शहर जलमय झालं आहे.

उत्तराखंडसह डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

उत्तरेकडील प्रदेशांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तराखंड आणि इतर डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे, दिल्ली एनसीआर आणि यूपीच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस चालू आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मंगळवारीही अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे. संततधार पावसामुळे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशामध्ये अलर्ट, भोपाळमध्ये शाळांना सुट्टी

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बंगालमध्ये मान्सून सक्रिय आहे. ओडिशातील नबरंगपूर, नौपाडा, बोलंगीर आणि बरघ या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: India Weather Update Heavy Rain Alert Rain Live Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..