भारतातील गुंतवणूक धोक्‍यात येईल:चीनचा इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

बीजिंग - भारत-चीन सीमारेषेजवळ भारताकडून रणगाडे तैनात करण्यात आल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर तीव्र नाराजी व्यक्त करत येथील चिनी सरकारच्या मालकीच्या सरकारी माध्यमांमधून भारताच्या या कृतीचा या देशात चीनकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर "परिणाम‘ होण्याची इशारा दिला. दोन देशांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही "ग्लोबल टाईम्स‘ या सरकारी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले.

"भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक चिनी कंपन्या पुढे येत असतानाच भारत-चीन सीमारेषेजवळ कोणताही धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी भारताकडून 100 रणगाडे आणण्यात आल्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. चिनी गुंतवणूक आपल्याकडे आकर्षून घेण्याच्या प्रयत्नांत भारत असतानाच चीनच्या सीमारेषेजवळ भारताकडून रणगाडे आणले जाणे, हे कोड्यात टाकणारे आहे,‘‘ असे या लेखामध्ये म्हटले आहे.

या सीमारेषेजवळ चीनकडून करण्यात येत असलेल्या पायाभूत व लष्करी सुविधांच्या आक्रमक विकासास उत्तर देण्यासाठीच भारताकडून लडाखमध्ये हे रणगाडे आणण्यात आल्याचा आरोप या लेखामध्ये करण्यात आला आहे. गेल्या मे महिन्यामध्ये ग्लोबल टाईम्सकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये 2015 मध्ये चीनकडून भारतामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये तब्बल सहा पटीने वाढ झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही गुंतवणूक एकूण 87 कोटी डॉलर्स किंमतीची होती, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

Web Title: India will be the danger of investing: Chinese warning