भारतीयांनो, आता तुम्ही वापरणार आहात जगातील सर्वांत शुद्ध पेट्रोल!

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

एक एप्रिलपासून भारत बनणार जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल, डिझेल वापरणारा देश

नवी दिल्ली : एक एप्रिलपासून भारत जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल वापरणारा देश बनणार आहे. भारताने देशभरात बीएस VI (युरो-VI) मानक असलेले कमी उत्सर्जन करणारे इंधन पुरवठा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. युरो-VI मानक इंधनात प्रदूषण करणारे सल्फरचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे जगात सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल.

अखेर कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे 

देशभरातील जवळपास सर्वच रिफायनरीमध्ये सल्फरचे अत्यल्प प्रमाण असलेले इंधन तयार करण्यात येत असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे (आयओसी) अध्यक्ष संजीव सिंग यांनी म्हटले आहे. तसेच सध्या काही राज्यात पुरवठा होत असलेले बीएस VI इंधन एक एप्रिलपासून संपूर्ण देशात पुरविले जाईल असे त्यांनी सांगितले. सरकारी मालकीच्या तेलशुद्धीकरण कंपन्यांनी सल्फरचे अत्यल्प प्रमाण असणारे अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी  35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या अगोदर देखील या कंपन्यांनी बीएस IV मानक ते बीएस VI मानक (युरो-VI ) इंधनासाठी रिफायनरी अद्ययावत करताना 60 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीएस VI इंधनात सल्फरचे प्रमाण फक्त 10 पीपीएम इतके असते. यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शुद्ध सीएनजी सारखेच अत्यंत कमी असते. भारताने 2010 साली 350 पीपीएम सल्फर असलेल्या भारत III ची अंमलबजावणी केली होती. तर 50 पीपीएम सल्फर असलेल्या बीएस IV मानकाच्या इंधनाची अंमलबजावणी 2017  मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर बीएस ५ ला वगळून अवघ्या तीनच वर्षात भारताने बीएस VI सक्षम इंधन पुरवठा करणारी यंत्रणा उभारली आहे. जी कोणत्याही प्रगत देशाच्या तुलनेत अत्यंत जलद आहे.

नवीन इंधनामुळे बीएस-VI वाहनांमधून नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण पेट्रोल कारमधून  25 टक्क्यांनी तर डिझेल कारमधील 70 टक्क्यांनी घटेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will use Purest Petrol diesel from 1 April