भारतीयांचे नववर्षाला चौदाशे कोटी व्हॉट्सऍप मेसेजेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली- नवीन वर्ष स्वागताचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीयांनी सर्वाधिक पसंती व्हॉट्सऍपला दिली असून, 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस व्हॉट्सऍपवरून पाठविले आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

जगभरात सोशल नेटवर्किंगसाठी व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीय नेटिझन्सनी यंदा व्हॉट्सऍपला सर्वाधिक पसंती दिली. 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस भारतीयांनी पाठविले आहेत.

व्हॉट्सऍप कंपनीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'नेटिझन्सची गरज ओळखून व्हॉट्सऍपमध्ये सातत्याने बदल केले गेले आहेत. यामुळेच जगभरात व्हॉट्सऍपला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. यापुढेही वेगवेगळे बदल केले जाणार आहेत. भारतातून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेसेजेस एका दिवसात पाठविले गेले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री चौदाशे कोटी मेसेजेस बरोबरच 310 कोटी इमेजेस, 70 कोटी जिफ इमेजेस व 61 कोटी व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. शिवाय, व्हाइस मेसेजचाही मोठ्या प्रमाणात वापर केले गेला आहे.'

दरम्यान, नववर्षानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याने एसएमएसची संख्या रोडावली आहे.

Web Title: Indian 14 bn messages sent on New Year’s eve