जोधपूरजवळ हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक सुरक्षित

mig
mig

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळील बानाड भागात आज (मंगळवार) सकाळी हवाई दलाचे विमान कोसळले. या अपघातातून वैमानिक सुखरूप बचावले आहेत.

जोधपूर एअरबेसवरून या विमानाने उड्डाण घेतले होते. हवाई दलातील मिग 27 हे लढाऊ विमान होते. हवाई दलाचे प्रवक्ते कर्नक संबित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे या विमानाने उड्डाण घेतले होते. अपघातातून वैमानिक बचावला आहे. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे.

अपघातानंतर पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोचले आणि विमानाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. जुलैमध्ये हिमाचल प्रदेशात मिग 21 हे विमान कोसळले होते. यात वैमानिकाचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com