'एएन-32' विमानाची माहिती देणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

लष्कर, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान आणि अरुणचल प्रदेशाचे पोलिसही या विमानाचा शोध घेत आहेत. आता हवाई दलाने याबाबतची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. तसेच विमानासंबंधी माहिती देण्यासाठी 9436499477/9402077267/9402132477 हे क्रमांक देण्यात आले आहेत.

इटानगर : हवाई दलाच्या बेपत्ता 'एएन-32' विमानाचा शोध भारतीय हवाई दलाकडून घेण्यात येत असून, आता या विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

या विमानात कर्मचारी व प्रवासी मिळून 13 जण आहेत. अरुणाचल प्रदेशाच्या पश्‍चिम सिआंग जिल्ह्यातील मेचुकाला निघालेले हे विमान सोमवारपासून बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी हवाई दलाने दोन 'सुखोई-30' ही विमाने तैनात केली आहेत. 'सी-130 जे' आणि 'एएन-32' विमानांसह दोन 'एमआय-17' आणि दोन 'एएलएच' हेलिकॉप्टरचा ताफा या विमानाच्या शोधात आधीपासूनच घेत आहे. 

लष्कर, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान आणि अरुणचल प्रदेशाचे पोलिसही या विमानाचा शोध घेत आहेत. आता हवाई दलाने याबाबतची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. तसेच विमानासंबंधी माहिती देण्यासाठी 9436499477/9402077267/9402132477 हे क्रमांक देण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Force announces rs 5lacs for info on missing AN32 aircraft