काश्मीरमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

aeroplane
aeroplane

श्रीनगर : भारतीय हवाई दलाचे मिग 21 हे लढाऊ विमान आज (बुधवार) सकाळी बडगाम जिल्ह्यातील कलान गावात कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक हुतात्मा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरहून उड्डाण घेतलेल्या या मिग 21 विमानामध्ये बडगामजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह सह वैमानिकही हुतात्मा झाला आहे. हवाई दलाकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय हवाई दलातील मिराज या लढाऊ विमानाने पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर देशभरातून हवाई दलाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र, आज हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com