पुलवामा हल्ल्याचा बारावा अन् 12 विमानांचीच घेतला बदला

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे म्हटले होते. अखेर भारताने या हल्ल्याच्या 12 व्या दिवशीच 12 विमानांनी हल्ला करत बदला घेतल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनीच पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला.

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आल्याने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. या हल्ल्याबद्दल देशभरातून जवानांचे कौतुक करण्यात येत आहे. 

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे म्हटले होते. अखेर भारताने या हल्ल्याच्या 12 व्या दिवशीच 12 विमानांनी हल्ला करत बदला घेतल्याचे बोलले जात आहे. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये सुमारे 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Force Miraj fighter plane attacked in Pakistan