हवाई संचलनात जैवइंधन वापरणार 

Indian Air force to use bio fuel in Republic Day parade
Indian Air force to use bio fuel in Republic Day parade

नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलन सोहळ्यात भारतीय हवाई दल मालवाहू एएन-32 विमानात जैवइंधनाचा वापर करणार आहे. हवाई संचलन हे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य संचालनाचा महत्त्वाचा भाग आहे.

एएन-32 विमानात दहा टक्के जैवइंधन, तर उर्वरित 90 टक्के इंधन एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल (एटीएफ) चा वापर करण्यात येणार आहे. संचलनात सहभागी होणाऱ्या उर्वरित विमानांत नियमित हवाई इंधन असणार असल्याचे हवाई दलाच्या सूत्राने सांगितले.

विमानातील इंधनाचा खर्च दहा टक्के कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर करण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाने केला. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एएन-32 वाहतूक विमानात जैव इंधनचा वापर करण्यात येत आहे.

मालवाहू विमानात जैवइंधनाचा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात लढाऊ विमानातही जैवइंधन वापरण्याचा विचार भारतीय हवाई दल करत आहे. त्यानुसार सुखोई-30, मिग-29 एस आणि अन्य विमानांत जैवइंधन वापराबाबत विचार केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com