विमानांबरोबरच तंत्रज्ञान द्यावे लागणार - एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

हवाईदल प्रमुख : भारत करणार ११४ विमानांची मेगा खरेदी
Indian Air Force will procure 114 multirole fighter jets Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari delhi
Indian Air Force will procure 114 multirole fighter jets Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari delhisakal

नवी दिल्ली : भारतीय हवाईदल लवकरच ११४ बहुआयामी लढाऊ विमाने खरेदी करणार असून या महाप्रकल्पाचे कंत्राट ज्याला मिळेल त्याला मूळ तंत्रज्ञान देखील हस्तांतरित करावे लागेल. पुढे याच तंत्रज्ञानाचा ‘मेक-इन-इंडिया’ प्रकल्पांतर्गत विमानांच्या निर्मितीसाठी वापर करण्यात येईल, असे हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी सांगितले. बहुआयामी मारक क्षमता असणाऱ्या या विमानाचा हवाईदलामध्ये समावेश झाल्याने यामुळे मारक क्षमता तर वाढेलच पण त्याचबरोबर लष्करी मोहीम देखील वेगाने राबविणे शक्य होईल असे सांगण्यात आले. भारतीय हवाईदलाने २०१९ मध्ये ११४ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठीची निविदा काढली असून त्याबर तब्बल अठरा अब्ज डॉलर एवढा खर्च होणार आहे.

जगाच्या लष्करी इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमानांची खरेदी केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अब्जावधी डॉलरच्या प्रकल्पासाठी लॉकहीड मार्टिनची ‘एफ-२१’, बोईंगची ‘एफ/ए-१८’, डसॉल्ट एव्हिएशनची ‘राफेल’, द युरोफायचर टायफून, रशियातील लढाऊ विमानांची निर्मिती करणारी ‘मिग-३५’ आणि स्वीडनमधील आघाडीची कंपनी ‘साब’ची ग्रिपेन जेट यांची नावे चर्चेमध्ये आहेत.

‘मेक-इन- इंडिया’साठी वापर

संरक्षण संपादन प्रक्रिया-२०२०मध्ये समाविष्ट असलेल्या विविध तरतुदींअंतर्गत ही सगळी खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या कुणा कंपनीला या विमानांच्या निर्मितीचे कंत्राट मिळेल तिला विमानांसोबतच तंत्रज्ञान देखील हस्तांतरित करावे लागेल. पुढे याच तंत्रज्ञानाचा मेक-इन- इंडियासाठी वापर केला जाणार असून देशांतर्गत लढाऊ विमानांच्या निर्मितीची भारताची क्षमता आणखी वाढेल, असे चौधरी यांनी नमूद केले.

राहुल यांचा केंद्रावर निशाणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवरून आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान त्यांच्या मित्रांना पन्नास वर्षांसाठी विमानतळे वापरण्यास देऊन दौलतवीर बनवित असून तरूणांना मात्र चार वर्षांसाठी भरती करून त्यांनी अग्निवीर करण्यात येईल.

अग्निपथसाठी ५६ हजार अर्ज

केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘अग्निपथ’ या भरती प्रक्रियेला देशभरातून तीव्र विरोध होत असतानाही सरकारने ही प्रक्रिया पुढे रेटून नेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निपथ’अंतर्गत भरतीला सुरूवात केली असून आतापर्यंत ५६ हजार ९६० अर्ज आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या भरती प्रक्रियेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे हवाईदलाकडून ट्विटरवर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. ट्विटरवर हवाई दलाकडून या भरतीबाबत माहिती देण्यात आली असून त्यामध्ये नियुक्तीची प्रक्रिया, प्रशिक्षण, वेतन आणि अन्य अनुषंगिक लाभांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ५ जुलैपर्यंतच अर्ज करता येतील. भारतीय हवाई दलाने ‘अग्निपथ’अंतर्गत २४ जून रोजीच भरतीला सुरूवात केली होती. अवघ्या तीन दिवसांमध्ये या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांचे भवितव्य अनिश्चित असून केंद्र सरकारने त्यांच्या निवृत्तीचे वय वाढवून ते ६५ वर्षे करावे.

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com