हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावाजवळ मिळाले आहेत. या विमानाचे वैमानिक आशिष तंवर (वय 29) यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले.

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या विमानाचे आज (बुधवार) अवशेष सापडले असून, त्यामधील 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावाजवळ मिळाले आहेत. या विमानाचे वैमानिक आशिष तंवर (वय 29) यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले.

विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे एकूण 13 जण होते. तंवर हे हरियाणातील पलवल येथील रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. तंवर हे हरियाणातील पलवल येथील रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.

भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे वाहतूक विमानाने सोमवारी (ता. 3) आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले होते. विमान उड्डानानंतर 33 मिनिटांनी बेपत्ता झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून विमानाचा शोध सुरू होता. हवाई दलातर्फे सुरू असलेल्या शोधमोहिमेत नौदलानेही सहभाग घेत त्यांचे दीर्घ पल्ल्याचे पी 8 आय हे विमान शोधासाठी पाठवली होती.

दरम्यान, रशियन बनावटीच्या एएन-32 या विमानाने विमानतळावरून दुपारी 12.25 वाजता उड्डाण केल्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हे विमान अरुणाचल प्रदेशातील शियोमी जिल्ह्यातील मेनचुका येथे जात होते. मेनचुका चीनच्या सीमेजवळ आहे. या विमानाच्या शोध मोहिमेमध्ये हवाई दलासह, लष्कर, सरकारी तपास संस्था आणि स्थानिक पोलिस सहभागी झाले आहेत. हवाई दलाची सी-130 आणि दुसरे एएन-32 विमाने आणि दोन एमआय-17 हेलिकॉप्टर विमाने, तर लष्कराचीही हेलिकॉप्टरर्स शोध घेत होती. शिवाय, या शोधमोहिमेवर संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे लक्ष ठेवून होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian Air Forces missing planes remains were found and pilot Ashish tanwar dead in accident