भारतात दिवाळी तर पाकमध्ये शिमगा...

Indian Air Strike
Indian Air Strike

नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारतामध्ये दिवाळी साजरी होत असून, पाकिस्तानमध्ये शिमगा आहे.

भारतीय नागरिकांची आजची सकाळ मोठ्या उत्साहात साजरी झाली. भारताच्या लढाऊ विमानांनी बलाकोट परिसरावर हवाई हल्ले केल्याची बातमी समजल्यानंतर नागरिकांमध्ये उत्साह संचारू लागला. ठिकठिकाणी फटाके फोडले जात आहेत. मिठाई वाटून आनंद साजरा केला जात आहे. भारत माता की जय... च्या जयघोषात मातृभूमी न्हावून निघाली आहे.

भारतीय नेटिझन्स सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे अभिनंदन करत आहे. हवाई हल्ल्याची छायाचित्रे व्हायरल करत असून, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानमध्ये भययुक्त गंभीर वातावरण आहे. भारताने हल्ला केल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली असून, गंभीर वातावरण पहायला मिळत आहे.

थोडक्यात, भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतामध्ये दिवाळी तर पाकिस्तानमध्ये शिमगा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com