'विरोधकांना पुढच्या वेळी विमानाला बांधून नेले पाहिजे'

opposition leaders should tie to flight and send for opearation says vk singh
opposition leaders should tie to flight and send for opearation says vk singh

नवी दिल्लीः भारताने पुढच्या वेळी जर काही केले तर मला वाटते विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांना विमानाच्या खाली बांधून नेले पाहिजे. जेव्हा बॉम्ब सोडणार असतील तेव्हा टार्गेट बघून घेतील. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवले पाहिजे. यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावे’, असे केंद्रीय मंत्री व्ही कें सिंग यांनी म्हटले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावरून विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, व्ही. के. सिंग यांनी या उत्तर दिले आहे.

व्ही. के. सिंग यांनी ट्विटरही एक मजेशीर ट्विट केले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, 'रात्री 3.30 वाजता खूप मच्छर होते म्हणून मी हिट मारले. आता किती मच्छर मारले हे मोजत बसू…की आरामशीर झोपू?' सिंग यांच्या ट्विटवर नेटिझन्सनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'तुम्ही गोष्टी मोजत बसणार आहात का ? बॉम्बस्फोट घडवण्यात आले... इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या…1000 किलोचा बॉम्ब टाकल्यानंतर लोकांचा मृत्यू होणार नाही का ? जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही किती जण गेले आहेत याचा अंदाज लावू शकता.'

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी 250 दहशतवादी मारले गेल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरुन टीका करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com