हवाई दलाचे 'सुखोई' आसाममध्ये क्रॅश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सुखोई -30 एमकेआय विमानातून प्रशिक्षण सुरू होते. परंतु, रात्री साडेआठच्या सुमारास हे विमान अपघातग्रस्त झाले आणि एका शेतात पडले व आग लागली.

तेजपूर : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोईचा गुरूवारी (ता. 8) रात्री अपघात झाला. आसाममधील तेजपूर जवळ प्रशिक्षणादरम्यान ही घटना घडली. सुखोईतील दोन्ही वैमानिक विमातून सुखरूप बाहेर पडले व आता ते सुरक्षित आहेत. त्यांच्यापैकी एका वैमानिकाच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिली.

सुखोई -30 एमकेआय विमानातून प्रशिक्षण सुरू होते. परंतु, रात्री साडेआठच्या सुमारास हे विमान अपघातग्रस्त झाले आणि एका शेतात पडले व आग लागली. तसेच या दुर्घटनेत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी दोन्ही वैमानिकांना नजिकच्या सैन्याच्या रूग्णालयात दाखल केले असल्याचे ते म्हणाले.

या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Airforce Sukhoi Crashed Near Assam Tejpur