सरन्यायधीश पदाच्या स्पर्धेतून अमूल थापर बाहेर

पीटीआय
रविवार, 8 जुलै 2018

प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी न्यायधीश अमूल थापर हे अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीश पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. अंतिम तीन जणांच्या यादीत ते स्थान मिळवू शकले नाही. या तीन जणांमधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका उमेदवाराचे नाव सुचवणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायधीश अँथनी केनेडी यांची जागा घेण्यासाठी न्यायधीश पदासाठीच्या नव्या उमेदवाराची घोषणा सोमवारी ट्रम्प करणार आहेत. 
 

वॉशिंग्टन: प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी न्यायधीश अमूल थापर हे अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीश पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. अंतिम तीन जणांच्या यादीत ते स्थान मिळवू शकले नाही. या तीन जणांमधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका उमेदवाराचे नाव सुचवणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायधीश अँथनी केनेडी यांची जागा घेण्यासाठी न्यायधीश पदासाठीच्या नव्या उमेदवाराची घोषणा सोमवारी ट्रम्प करणार आहेत. 

नॅशनल पब्लिक रेडिओ (एनपीआर)च्या मते, ट्रम्प यांनी संभाव्य उमेदवारांची यादीतील अन्य नावे वगळून केवळ तीनच नावे ठेवली आहेत. त्यात ब्रेट काव्हानह, अर्मी कोनी बॅरेट आणि रेमंड कॅथलॅग यांचा समावेश आहे. पहिली दोन नावे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

Web Title: Indian American judge Amul Thapar not in Trump's shortlist for US Supreme Court