शीख जवानांना भडकावण्याचा पाकचा प्रयत्न

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

लबीर सिंह नावाच्या कोणत्याही जवानाने आत्महत्या केलेली नाही. जवानांमध्ये अफवा पसरविण्याचे काम पाकिस्तान करत आहे.

नवी दिल्ली- भारतीय लष्करातील शीख जवानांना भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यास सांगितल्यानंतर एका शीख सैनिकाने आत्महत्या केल्याची अफवा पसरवणारी एक पोस्ट सध्या पाकिस्तानी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहे. #RestinPeacebalbirSingh या हॅशटॅगने अनेकजण ट्विट करताना दिसत आहेत.

पाकिस्तानवर हल्ला करण्यास सांगितल्याचा धक्का सहन न झाल्याने एका शीख जवानाने आत्महत्या केली. भारतीय शीख जवान पाकिस्तानविरुद्ध लढण्यास तयार नव्हता, अशा प्रकारचे दोन ट्विट अपलोड होत आहेत. पाकिस्तानमध्ये ट्विटरसह सोशल नेटवर्किंगवरून अफवा पसरू लागली आहे.
 
भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले की, बलबीर सिंह नावाच्या कोणत्याही जवानाने आत्महत्या केलेली नाही. जवानांमध्ये अफवा पसरविण्याचे काम पाकिस्तान करत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भारतीय लष्कर सतर्क झाले असून, देशभरातील कमांडर मुख्यालयांना दक्षतेचा दिला आहे. लष्कराने मुख्यालयाने पाकिस्तानी ट्विट्समधील माहिती वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत दिली आहे. भारतीय जवानांना भडकावण्याचा पाकिस्तानचा डाव पुढे येत आहे.

Web Title: indian army against pakistani tweets