
आपल्या मोबाईलमधून फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह ८० विविध ॲप काढून टाकण्याचे आदेश भारतीय लष्कराने आपल्या अधिकारी आणि जवानांना दिले आहेत.
नवी दिल्ली : लष्करातील जवान आणि बडे अधिकारी मिळून जवळपास 13 लाख जणांच्या स्मार्ट फोनमधील फेसबुक आता डिलिट होणार आहे. केवळ फेसबुकच नव्हे तर, सोशल मीडियाशी संबंधित एकूण 89 ऍप डिलिट करण्याचे आदेश लष्कराने जवान आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात फेसबुकसह इंस्टाग्रामचाही समावेश आहे.
आणखी वाचा - उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर, विकास दुबे टोळीतील दोघांचा खात्मा
कारवाईचा इशारा
आपल्या मोबाईलमधून फेसबुक आणि इंस्टाग्रामसह ८० विविध ॲप काढून टाकण्याचे आदेश भारतीय लष्कराने आपल्या अधिकारी आणि जवानांना दिले आहेत. गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी १५ जुलैपर्यंत हे ॲप मोबाईलमधून काढावेत, असे लष्कराने सांगितले असून, या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या जवानांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तान आणि चीनमधील गुप्तचर संस्था इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे लष्करातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लष्कराने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअपचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी जे अधिकारी महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित असतात त्यांना स्मार्टफोनमधून फेसबुक डिलिट करण्याचे आदेश दिले होते. आता लष्कराने सर्व जवान आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.