सीमा भागात भेट देऊन लष्कर प्रमुखांकडून सज्जतेचे कौतुक

Indian Army Chief Gen Bipin Rawat Reviews Situation Along Line Of Control In Jammu Region
Indian Army Chief Gen Bipin Rawat Reviews Situation Along Line Of Control In Jammu Region

जम्मू : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज (ता. 4) जम्मू भागातील भारत-पाक सीमेवरील नाक्‍यांची पाहणी केली. सांबा आणि रत्नुचक भागातील लष्करी छावण्यांना त्यांनी भेट देऊन तेथील ऑपरेशनल प्रिपेअरडनेसचा आढावा घेतला.

लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, येथील सज्जतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची पुर्ण तयारी तेथे असल्याची ग्वाही जनरल रावत यांनी यावेळी दिली. त्या भागातील लष्कराचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी त्यांना तेथील स्थिती आणि तयारी याविषयीची माहिती दिली. लष्कर प्रमुखांनी तेथे तैनात असलेल्या जवानांशीही संवाद साधला.

यावेळी सैन्याच्या नैतिक आणि सज्जतेच्या उच्च दर्जाचे कौतुक करत जनरल रावत यांनी शत्रूंच्या कोणत्याही कारवायांना भारतीय सैन्य हाणून पाडू शकते, असा विश्वास दर्शविला. 

शनिवारी रात्री लष्कर प्रमुखांचे जम्मूत आगमन झाले आणि त्यांनी तेथील लष्करी मुख्यालयात अधिकाऱ्यांचीही एक बैठक घेतली. बैठकीत सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला. लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग हेही त्यांच्या समवेत होते. भारताने पाकिस्तानावर हवाई हल्ला केल्यानंतर लष्कर प्रमुखांनी सीमा भागात भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. 

जम्मू काश्‍मीरच्या पुंछ आणि राजौरी सेक्‍टर मध्ये पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. सीमा भागातील 80 खेड्यांना पाकिस्तानी लष्कराने गेल्या काही दिवसांत लक्ष्य केले आहे. त्या गोळीबारात आतापर्यंत चार नागरीक ठार झाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com