पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर 23 डिसेंबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. या हुतात्मा जवानांमध्ये महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश होता. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून पाक सैनिकांचा खात्मा केला.

श्रीनगर - पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सहा पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय जवान पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर 23 डिसेंबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या गोळीबारात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. या हुतात्मा जवानांमध्ये महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश होता. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून पाक सैनिकांचा खात्मा केला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) रावळकोट येथे भारतीय जवानांनी ही कारवाई केली. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बलूच रेजिमेंटच्या सहा सैनिकांना ठार मारले. मात्र, पाकिस्तानकडून आमचे तीन सैनिक मारले गेले असल्याचे म्हटले आहे. भारतीय जवानांच्या या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. याविरोधात लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Web Title: Indian Army crosses LOC to retaliate kills six Pakistani soldiers