भारताचा पाकिस्तानला प्रस्ताव; सफेद ध्वज आणा अन् मृतदेह घेऊन जा

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

भारतीय जवानांकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पडून आहेत. भारतीय लष्कराकडून हे मृतदेह पाकिस्तान सेनेला घेऊन जाण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. भारताकडून सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानी लष्कराने सफेद झेंडा घेऊन हे मृतदेह घेऊन जावेत.

नवी दिल्ली - भारतीय जवानांकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पडून आहेत. भारतीय लष्कराकडून हे मृतदेह पाकिस्तान सेनेला घेऊन जाण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. भारताकडून सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानी लष्कराने सफेद झेंडा घेऊन हे मृतदेह घेऊन जावेत.

भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या डावपेचाला उत्तर देत पाकिस्तानचे अंदाजे 7 जवान आणि दहशतवादी मारले. सीमा भागातून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराने उधळून लावलं.

भारतीय लष्कराच्या कारवाईत जे दहशतवादी मारले गेले त्यांचे मृतदेह सीमेवर पडून आहेत. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे असतील तर पाकिस्तानी लष्कर हे मृतदेह घेऊन जाऊ शकते. मात्र त्यासाठी त्यांना सफेद झेंडा घेऊन यावं लागेल असे सांगण्यात आले आहे. परंतु, पाकिस्तानकडून यावर अजूनतरी  कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army Have offered Pakistan to take over the dead bodies