भारतीय सैनिकांना मिळणार आधुनिक हेल्मेट

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली- सशस्त्र दलांच्या सैनिकांना अधिक चांगले संरक्षण पुरविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराने आपल्या जवानांना जागतिक दर्जाचे आधुनिक हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

लष्करी जवानांच्या सुरक्षेसाठी चिलखत उत्पादन करणाऱ्या कानपूरस्थित MKU इंडस्ट्रीजला 1.58 लाख नवी हेल्मेट बनवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट एकूण किंमत सुमारे 170 ते 180 कोटी रुपयांचे असून ते पूर्ण होण्यास 3 वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.

हे नवीन हेल्मेट 9 मिलीमीटरच्या गोळीचा मारा सहन करू शकेल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. तसेच संपर्काच्या अद्ययावत साधनांशीही हे हेल्मेट जोडता 
येणार आहे. सध्या भारतीय जवान वापरत असलेले हेल्मेट 2.5 किलो वजनाचे आहे. त्यामुळे लढाईवेळी वापरण्यासाठी ते तितकेसे सुखकर ठरणार नाही.  

निमलष्करी दलाच्या विशेष तुकडीला अत्याधुनिक हेल्मेट मिळाल्यानंतर तब्बल दशकभरानंतर ही सुधारणा करण्यात आली आहे. त्यावेळी सैन्यदलाच्या विशेष तुकडीला आधुनिक इस्रायली OR-201 हे रिइनफोर्सड् प्लास्टिक ग्लासने बनलेले हेल्मेट देण्यात आले होते. नवीन हेल्मेटमुळे सैनिकांना अधिक संरक्षण मिळेल, तसेच त्यामुळे जवानांना अधिक सुसज्ज बनतील.
 
Web Title: indian army jawans to get modern helmets