भारताकडून पाकिस्तानचे चार बंकर उद्ध्वस्त

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

या व्हिडिओमध्ये कृष्णा घाटी परिसरातील चार पाकिस्तानी बंकर उडविताना दिसत आहे. तसेच भारतीय जवान आपल्या अधिकाऱ्यांना बंकर उद्ध्वस्त केल्याचे सांगताना ऐकू येत आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानी सैन्याकडून दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्याच्या कृत्याचा भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानचे चार बंकर उद्ध्वस्त केले आहेत.

एका वृत्तवाहिनीने याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे चार बंकर बेचिराख केल्याचे दिसत आहे. भारतीय जवानांनी सहा वेळा केलेल्या स्फोटात हे बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने अँटी गाईडेड मिसाईलने पाकिस्तानी बंकरवर हल्ला केला.

या व्हिडिओमध्ये कृष्णा घाटी परिसरातील चार पाकिस्तानी बंकर उडविताना दिसत आहे. तसेच भारतीय जवान आपल्या अधिकाऱ्यांना बंकर उद्ध्वस्त केल्याचे सांगताना ऐकू येत आहे. पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याच भागात पाकिस्तानी सैन्याने दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. भारतीय लष्कराने यापूर्वीच सांगितले होते, की हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: indian army the pak bunker was destroyed near the krishna ghati sector