भारताकडून पाक सैन्याचे मुख्यालय उद्ध्वस्त; पीओकेमध्ये 22 दहशतवाद्यांचा खात्मा 

टीम ई-सकाळ
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देले. त्यात 20 ते 22 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देले. त्यात 20 ते 22 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील नीलम व्हॅलमध्ये भारतीय जवानांनी हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. या तळांवरून ताबा रेषा पार करून, भारतात दहशतवादी घुसवले जात होते, अशी माहिती लष्कराने दिले. सुरुवातीला भारताच्या हल्ल्यात चार ते पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय उध्वस्त करण्यात आले आहे. 

Image

दरम्यान, भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवातीला या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती मिळाली होती. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. 

Image

तत्पूर्वी, पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian army pakistan army base in pok 22 terrorist killed