भारतीय लष्कराच्या कारवाईत 7 पाकिस्तानी सैनिक ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

पाकिस्तानकडून गेल्या शनिवारी राजौरी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला होता. या पार्श्‍वभूमीवर संतप्त भारतीय लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये चार पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे म्हटले आहे

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील पूंछ जिल्ह्यामध्ये आज (सोमवार) भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या सात जवानांना ठार करण्यात आले; तर चार जखमी झाले.

पाकिस्तानकडून गेल्या शनिवारी राजौरी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला होता. या पार्श्‍वभूमीवर संतप्त भारतीय लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये चार पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे म्हटले आहे.

भारताचे लष्करप्रमुख जनरल बीपिन रावत यांनी नुकताच पाकिस्तानला भारतीय लष्कर धडा शिकवित असल्याचे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर झालेली ही कारवाई अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: indian army pakistan jammu kashmir