लष्कराने दिले पुरावे; ममतांचे आरोप निकालात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विविध टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीसाठी नियमित सराव आणि तपासणीसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचे पुरावे सादर करून लष्कराने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

ममता यांनी टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळजनक आरोप केले होते. त्याननंतर लष्कराचे बंगाल विभागातील मेजर जनरल सुनील यादव यांनी याबाबतची कागदपत्रे थेट माध्यमांसमोर सादर करीत निर्वाळा दिला. 

"लष्कराकडून करण्यात येणारी तपासणी नियमितच आहे. विविध राज्यांतील प्रवेशद्वारांवर, टोल नाक्यांवरून अशी तपासणी करून अवजड वाहनांबाबतची माहिती गोळा केली जाते. तसेच हे काम लष्कर एकट्याने करत नाही, तर स्थानिक पोलिसही लष्करासोबत असतात," असे मेजर जनरल यादव यांनी सांगितले. 
हा सराव सुरू करण्यापूर्वी परवानगी आणि सहकार्य मिळावे यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या चार विविध विभागांना लष्कराकडून देण्यात आलेली पत्रं यावेळी त्यांनी सादर केली. 

Web Title: Indian Army proves Mamata Banerjee wrong