'…तर भारताचे लष्कर पीओकेमध्ये हल्ला करेल' 

वृत्तसंस्था
Friday, 3 January 2020

भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइकसारखी मोहमी राबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी भूमिकाच लष्करप्रमुख नरवणे यांनी व्यक्त केली आहे. 

 

दिल्ली : लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार घेताच ते लगेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, ''भारतीय लष्कराला आदेश दिल्यास आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करण्यास सज्ज आहोत.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, लष्करप्रमुखांच्या या भूमिकेमुळे गरज पडल्यास भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइकसारखी मोहमी राबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ''भारताच्या सर्व सीमांवर सैन्य तैनात आहे. गरज पडल्यास अगदी जम्मू-काश्मीरसाठीही आमच्या विशेष योजना तयार आहेत. या योजना अंमलात आणल्या जाऊ शकतात. आम्हाला एखादी मोहीम करण्याचे आदेश आल्यास आम्ही ती यशस्वीपणे पूर्ण करु शकतो,” असंही नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे.

File Picture of Lieutenant General Manoj Mukund Naravane who will be the 28th Chief of Army Staff and will succeed General Bipin Rawat on December 31. (ANI )

यावेळी भारतीय लष्कर पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करु शकतो का?, असा सवाल नरवणे यांना विचारण्यात आला असता त्यांनी, “तसे आदेश आल्यास” एवढचं उत्तर दिलं. पाकिस्तान दहशवादाच्या माध्यमातून भारतावर छुपे युद्ध लादत असल्याचा आरोपही नरवणे यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

“पाकिस्तानकडून अनेकदा शस्रसंधीचे उल्लंघन होते. आम्हाला ठाऊक आहे की सीमेपलीकडील अनेक तळांवर दहशतवादी दबा धरुन आहेत. ते भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र अशाप्रकारच्या धोक्यांचा सामाना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत,” असंही नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे.

'पाक म्हणते आम्ही तयार'
दहशतवाद्यांच्या मुस्क्या आवळण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा हक्क भारताला आहे, असे मत नरवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलं होतं. नरवणे यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला होता. पाकिस्तानवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आमची सेना सज्ज असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian army is ready to attack pok if ordered new chief mm naravane tells tv channel