जाणून घ्या 'भारतीयांच्या मेंदूची साईझ' काय ?

जाणून घ्या 'भारतीयांच्या मेंदूची साईझ' काय ?

भारतीय वंशाची माणसं आपल्या बुद्धीचातुर्याने जगभरात प्रसिद्ध आहेत. अशातच तुम्हाला जर कोणी विचारलं की भारतीयांच्या मेंदूची साईझ काय ? भारतीयांचा मेंदू जगभरातील इतर माणसांच्या तुलनेत मोठा आहे का लहान? तर याचं उत्तर देणं आता सोपं झालंय. 

हैदराबादमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजीमधल्या संशोधकांनी भारतीयांच्या मेंदूवर रिसर्च केलाय. मेंदूचे वेगवेगळे स्कॅन करून हा रिसर्च करण्यात आलाय. यामध्ये भारतीय मेंदू हा जगातील इतर देशांच्या तुलनेत लहान असल्याचं स्पष्ट झालंय. भारतीय नागरिकांचा मेंदू हा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील लोकांच्या तुलनेत आकाराने आणि वाॅल्यूममध्ये लहान असल्याचं आता समोर आलंय. 

आणखी बातम्या वाचा ::

मेंदूचे आजार समोर ठेऊन हे संशोधन करण्यात आलं असल्याचं या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या जयंती सिवास्वामी यांनी सांगितलंय. यानुसार MNI म्हणजेच मॉन्ट्रियल न्यूरोलीजिकल इन्स्टिट्यूट टेम्प्लेटचा वापर करण्यात येतो. आतापर्यंत भारतीयांच्या मेंदूचा टेम्प्लेट अद्याप कुणीच बनवलं नव्हतं. अशातच आता करण्यात आलेला हा रिसर्च भारतीयांसाठी नक्कीच महत्त्वाचा असल्याचंही जयंती सिवास्वामी यांनी म्हटलंय.

WebTitle : Indian brains are smaller in size compared to eastern and western countries 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com