कोरोना वॅक्सिनसाठी भारतीय उद्योगपतीने दिले 3 हजार 300 कोटी रुपये

laxmi mittal donate 3300 crore for vaccine
laxmi mittal donate 3300 crore for vaccine

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यावर वॅक्सिनसाठी जगातील अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. या संशोधनाच्या कार्यात भारतीय उद्योगपतीने मोठी मदत केली आहे. उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी कोरोनावर वॅक्सिनच्या संशोधनासाठी 3 हजार 300 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना वॅक्सिनच्या संशोधनासाठी 3.5 मिलियन पाउंड दिले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हॅकिनॉलॉजी डिपार्टमेंटला हे अनुदान दिलं आहे. या अनुदानानंतर याचे डिपार्टमेंटचे नाव लक्ष्मी मित्तल अँड फॅमिली प्रोफेसरशिप ऑफ व्हॅकिनॉलॉजी असं केलं आहे.

जेनर इन्स्टिट्यूटची स्थापना 2005 मध्ये ऑक्सफर्ड आणि युके इन्स्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थसोबत पार्टनरशिपमध्ये केली होती. जगात वॅक्सिनच्या संशोधनासाठी या इन्स्टिट्यूटला अव्वल मानलं जातं. कोरोनावर वॅक्सिनच्या संशोधनामध्ये या इन्स्टिट्यूटचं काम वेगाने सुरु असून लवकरच यात यश मिळू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. ऑक्सफर्ट युनिव्हर्सिटीकडून इंग्लंड, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना वॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलचे काम सुरू आहे. प्रोफेसर अॅद्रियन हिल हे जेनर इन्स्टिट्युटचे संचालक आहेत. 

लक्ष्मी मित्तल म्हणाले की, कोरोनासारख्या साथीनंतर जगाला कोणत्याही प्रकारच्या साथीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार रहायला हवं. या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक नुकसान झालं आहे. प्रोफेसर हिल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जाणवलं की ते वॅक्सिन तयार करण्यासाठी काहीतरी करत आहेत. ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही साथीसाठी सज्ज राहिलं पाहिजे.

जगभरात आतापर्यंत एकूण 1 कोटी 23 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी साडेपाच लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत 32 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी  कोरोनामुळे 1 लाख 35 हजार जणांचा मृत्यू झाला. भारतात 8 लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली असून आतापर्यंत 21 हजार 776 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com