तिबटेमधील पुरात अडकले भारतीय नागरिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

चेन्नई : तिबेटमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते वाहून गेले आहे. कैलास मानसरोवरला गेलेेले अंदाजे 150 पेक्षा जास्त भारतीय यात्रेकरू मागील पाच तासांपासून अन्न-पाण्याविना इथे अडकून पडले आहेत. अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये बहुतेक यात्रेकरू वयस्कर नागरिक असून, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

हे सर्व यात्रेकरू परतिच्या वाटेवर होते. परंतु, सागा आणि केरुंग टाऊन भागात  अडकून पडलो आहोत. असे व्येंकटसुब्रमन्यम या तिथे अडकलेल्या यात्रेकरूने ही माहिती दिली. 

व्येंकटसुब्रमन्यम म्हणाले, इथे सहा बस अडकल्या आहेत. त्या अशा परिस्थितीत आहेत की बसच्या दोन्ही बाजूचा रस्ता पुरामुळे वाहून गेला आहे. बस मागे किंवा पुढे कुठे जाऊ शकत नाही. तिथे एका पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे वाहतूक जुन्या रस्त्याकडे वळविण्यात आली होती. पण हा जुना रस्ताच पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला. नेटवर्कच्या अभावामुळे अडकलेले यात्रेकरू चिन मधील भारतीय दुतावास कार्यालयाशी संपर्क करू शकले नाहीत. आम्ही अशी आशा करतो की आमच्यातील कोणीतरी सुरक्षित पोहचेल.
 
Web Title: Indian citizen stuck in tibet flood