पाकिस्तानच्या 90 हिंदूंना भारतीय नागरिकत्व

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

2016 मध्ये केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याक हिंदूंसाठी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया विकेंद्रीकृत केली आहे. यासंदर्भातील गॅझेटमधील अधिसूचना डिसेंबर 2016 मध्ये काढण्यात आली.

अहमदाबाद : गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या 90 हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली. जिल्हाधिकारी विक्रांत पांड्ये यांनी 90 जणांना 1955च्या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. 

पांडे म्हणाले की, 2016 मध्ये केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याक हिंदूंसाठी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया विकेंद्रीकृत केली आहे. यासंदर्भातील गॅझेटमधील अधिसूचना डिसेंबर 2016 मध्ये काढण्यात आली. त्यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय नागरिकत्वाचे गुजरातमध्ये राहणाऱ्या हिंदू, शीख यांच्या भारतीय नागरिकत्वासंदर्भातील अर्जाचा निपटारा करण्याचे अधिकार देण्यात आले. आज 90 जणांना देण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वामुळे अहमदाबाद हे नव्या व्यवस्थेतील देशातील सर्वांत प्रमुख शहर बनले आहे, असे पांड्ये यांनी सांगितले. 

Web Title: Indian citizenship of 90 Hindus from Pakistan