एव्हरेस्ट सर केलेल्या भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यु

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

कुमार याने गेल्या शनिवारी दुपारी 1.28 च्या सुमारास एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळविले होते. कुमार याचा मार्गदर्शक लाक्‍पा वोंग्या शेर्पा यालादेखील हिमदंश झाल्याचे आढळून आले आहे. एव्हरेस्टवरुन खाली उतरताना कुमार व शेर्पाची चुकामूक झाल्याचे निष्पन्न झाले होते

काठमांडू - "माऊंट एव्हरेस्ट' सर केल्यानंतर परतताना सुमारे 200 मीटर उंचीवरुन खाली पडलेल्या 27 वर्षीय भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रवी कुमार हा 8,200 मीटर इतक्‍या उंचीवर असताना हा अपघात घडल्याचे येथील पर्यटन विभागाचे संचालक असलेल्या दिनेश भट्टाचार्य यांनी सांगितले. हा अपघात झालेल्या भागास बाल्कनी असे नाव आहे. एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस प्रारंभ करण्यापूर्वीचे हे शेवटचे विश्रांती स्थळ आहे.

कुमार याने गेल्या शनिवारी दुपारी 1.28 च्या सुमारास एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळविले होते. कुमार याचा मार्गदर्शक लाक्‍पा वोंग्या शेर्पा यालादेखील हिमदंश झाल्याचे आढळून आले आहे. एव्हरेस्टवरुन खाली उतरताना कुमार व शेर्पाची चुकामूक झाल्याचे निष्पन्न झाले होते.

1953 मध्ये एव्हरेस्ट पहिल्यांदाच यशस्वीरित्या सर करण्यात आल्यानंतर या शिखरावर पोहोचण्याच्या प्रयत्नांत आत्तापर्यंत सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील 200 पेक्षा अधिक मृतदेह हे अजूनही एव्हरेस्टवरच असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Indian climber found dead