काश्‍मीरवरून आफ्रिदीचे रडगाणे; कोहली, कैफचे सडेतोड उत्तर

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी दिल्ली : 'काश्‍मीरमधील 'निरपराधांच्या' हत्यांबद्दल' ट्विटरवर अश्रु ढाळणारा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीवर आज (बुधवार) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटू तुटून पडले. 'भारताच्या हिताला बाधा येईल, अशा कोणत्याही गोष्टीला कधीच पाठिंबा देणार नाही' असे कोहलीने ठामपणे सांगितले. 

"एक भारतीय म्हणून कायमच देशाचे हित पाहत असतो. याच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कधीच पाठिंबा देणार नाही. कुठल्या मुद्याविषयी जाहीर मत व्यक्त करायचे, ही वैयक्तिक निवड असते. (आफ्रिदीच्या वक्तव्याविषयी) पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यावर टिप्पणी करण्याची इच्छा नाही; पण काहीही असले, तरीही माझे प्राधान्य माझ्या देशालाच आहे', अशी भूमिका कोहलीने घेतल्याचे 'एएनआय'ने म्हटले आहे. 

भारतीय लष्कराने गेल्या काही दिवसांपासून काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. याविषयी आफ्रिदीने ट्‌विटरवर रडगाणे गायले होते आणि या प्रकरणी 'संयुक्त राष्ट्रां'नी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. 

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने कालच (मंगळवार) आफ्रिदीला सडेतोड उत्तर दिले होते. 

'आफ्रिदी आहे तरी कोण? त्याला इतके महत्त्व देण्याची गरज काय आहे?', असा प्रश्‍न भारताचे विश्‍वकरंडक विजेते कर्णधार कपिलदेव यांनी उपस्थित केला. 

भारताचा फलंदाज सुरेश रैना आणि माजी क्रिकेटपटू महंमद कैफ यांनीही आफ्रिदीच्या त्या रडगाण्यावर टीका केली. 

Web Title: Indian cricketers lash out at Shahid Afridi for Kashmir Tweet