इसिसकडून सुटका झालेल्या डॉक्टरांनी ऐकवली आपबीती

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

इसिसच्या दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. परंतू मी कोणावरही कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. तसेच, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात येत होती. मला नमाज पठण करण्यास शिकविण्यात आले, तसेच हिंसक व्हिडिओ दाखविण्यात आले.

नवी दिल्ली - लीबियातून इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेले भारतीय डॉ. के. रामामूर्ती यांनी सुटका झाल्यानंतर आपबीती ऐकवली.

दोन वर्षांपूर्वी इसिसकडून अपहरण करण्यात आलेले डॉ. के रामामूर्ती यांची भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून शनिवारी सुटका करण्यात आली. डॉ. के रामामूर्ती यांचे इसिसने दोन वर्षांपूर्वी लिबियामधून अपहरण केले होते. डॉ. के रामामूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनएसए आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

राममूर्ती यांनी सांगितले, की 10 दिवसांमध्ये माझ्यावर तीनवेळा गोळीबार करण्यात आला. ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन जबरदस्ती शस्त्रक्रिया करण्याचा प्रय़त्न करण्यात आला. इसिसकडून मला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करण्यात येत नव्हती. मात्र, इसिसच्या दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. परंतू मी कोणावरही कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. तसेच, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात येत होती. मला नमाज पठण करण्यास शिकविण्यात आले, तसेच हिंसक व्हिडिओ दाखविण्यात आले. रमजानमध्ये काही इसिसच्या दहशतवाद्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. मी मदत करण्यास नकार दिल्यानंतर माझे अपहरण करण्यात आले. सुरवातीला मला सिरते शहरात ठेवण्यात आले होते. त्यानंतर भूमिगत कारागृहात नेण्यात आले. त्याठिकाणी तुर्कस्तानमधील अनेक नागरिकांची भेट झाली. माझ्या डाव्या हातावर आणि दोन्ही पायावर गोळ्या मारण्यात आला. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात जबरदस्ती करण्यात आली.

Web Title: indian doctor ramamurthy freed from isis in libya