भारताकडून मला 'पोस्टर बॉय' बनविण्यात आलं : विजय मल्ल्या

भारताकडून मला 'पोस्टर बॉय' बनविण्यात आलं : विजय मल्ल्या

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून विजय मल्ल्या परदेशात पसार झाला. त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता विजय मल्ल्याने ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यामध्ये त्याने म्हटले, की ''भारताने मला 'पोस्टर बॉय' बनवले आहे. माझ्यावर जेवढे कर्ज होते, त्यापेक्षाही अधिक वसूली माझ्याकडून सरकारने केली आहे''.

विजय मल्ल्या पुढे म्हणाला, 1992 पासून मी युकेमध्ये राहत आहे. त्यामुळे मला फरार म्हणणे भाजपला योग्य वाटते का? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: म्हटले, की त्यांच्या सरकारने माझ्या बँक कर्जापेक्षा अधिकची वसूली माझ्याकडून केली आहे. असे आहे तर मग भाजपचे प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करत आहेत?

तसेच पंतप्रधानांची मुलाखत पाहिली. ज्यामध्ये ते माझे नाव घेऊन सांगत आहेत, की विजय मल्ल्याने बँकांचे 9 हजार कोटी घेऊन फरार झाले असले तरी त्यांच्या सरकारने मल्ल्या यांची 14 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com