भारतीय हॅकरकडून पाकच्या 500 साइट हॅक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पाकिस्तानी हॅकरनी काल दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली, आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह दहा वेबसाइट हॅक केल्या होत्या. त्यावर भारतविरोधी मजकूरही प्रसिद्ध केला होता.

नवी दिल्ली - पाकिस्तानी हॅकरनी भारतातील दहा विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्यानंतर त्याला प्रत्त्युत्तर देत भारतीय हॅकरनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या वेबसाइटसह सुमारे 500 वेबसाइट हॅक केल्या. 

पाकिस्तानी हॅकरनी काल दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली, आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह दहा वेबसाइट हॅक केल्या होत्या. त्यावर भारतविरोधी मजकूरही प्रसिद्ध केला होता. आता भारतीय हॅकरनी पाकिस्तानच्या 500 वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अयोग्य असल्याचा संदेश त्या वेबसाइटवर झळकविण्यात आला. 

भारतीय हॅकरनी हॅक केलेल्या बहुतांश वेबसाइट या सरकारी खात्यांशी संबंधित होत्या. ब्लॅक हॅट्‌स आणि युनायटेड इंडियन हॅकर्स या गटांनी पाकिस्तानी वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची वेबसाइटही हॅक झाली होती. पाकमधील सरकारी सर्व्हरवर टीम आयबीएच परत आली आहे. काश्‍मीरमधील हस्तक्षेप थांबवा, अशा आशयाचे संदेश या वेबसाइटवर झळकत होते. 
 

Web Title: Indian Hackers Take Down Over 500 Pakistani Websites In Response To Cyber Attacks Against Universities