'आयआयएम'च्या कोर्सेच्या फीमध्ये वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सर्वात प्रसिद्ध असणारे अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता आणि इंदौर या शहरांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या संस्थेमध्ये अमृतसर, ट्रिची, उदयपूर, रोहतक आणि रांची या संस्थेमध्ये व्यवस्थापनाच्या कोर्सेसाठी 9 ते 22 लाखांपर्यंत फी घेण्यात येत आहे.

नवी दिल्ली : 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' (आयआयए) अंतर्गत येणाऱ्या व्यवस्थापनातील सर्व कोर्सेसची फी वाढविण्यात आली आहे. यावर्षी जे विद्यार्थी प्रवेश घेतील या सर्व विद्यार्थ्यांना फीवाढीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काही संस्थांच्या फीमध्ये 5 ते 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 2018-2020 या दोन वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या फीवाढीचा फटका बसणार आहे.

iim

सर्वात प्रसिद्ध असणारे अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता आणि इंदौर या शहरांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या संस्थेमध्ये अमृतसर, ट्रिची, उदयपूर, रोहतक आणि रांची या संस्थेमध्ये व्यवस्थापनाच्या कोर्सेसाठी 9 ते 22 लाखांपर्यंत फी घेण्यात येत आहे. या अशा प्रकारचे व्यवस्थापनाचे कोर्सेस करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आणि त्यासाठी मोठ्या रकमेची गरज असल्याने ही फी वाढ करण्यात आली आहे. पदयुत्तर पदवीचे (मास्टर्स ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) शिक्षण घेणाऱ्या या सर्वांना नव्या फी वाढीमुळे 80 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत फी भरावी लागणार आहे.

याबाबत 'आयआयएम'चे संचालक ऋषिकेश क्रिश्न यांनी 'द इकोनॉमिक्स टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की आयआयएमने या वर्षी बंगळुरु येथील इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांसाठी 21 लाख रुपयांची गरज भासणार आहे. मागील वर्षी या कोर्सेसाठी 19 लाख 5 हजार रुपये इतकी फी होती. आता यामध्ये वाढ झाली आहे, असे क्रिश्न यांनी सांगितले. 

Web Title: Indian Institutes of Management to Increase Fees for 2018 2020 Session