इसिससाठी लढणारा केरळमधील तरुण ठार

पीटीआय
रविवार, 30 एप्रिल 2017

याह्याच्या कुटूंबीयांना गेल्या रात्री टेलिग्राम या सोशल मिडिया संदेशावरुन याह्याच्या मृत्युची बातमी कळविण्यात आली. हा संदेश पाठविणाऱ्या अस्फाक या व्यक्तीने याह्या हा "शहीद' झाल्याचे सांगितले

कासारगोड - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या केरळमधील एका मुस्लिम तरुणाचा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यु झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.

इस्लाम धर्म स्वीकारलेला याह्याचा केरळमधून गेल्या वर्षी इसिसमध्ये सहभागी झालेल्या 21 तरुणांमध्ये समावेश होता. याह्याच्या कुटूंबीयांना गेल्या रात्री टेलिग्राम या सोशल मिडिया संदेशावरुन याह्याच्या मृत्युची बातमी कळविण्यात आली. हा संदेश पाठविणाऱ्या अस्फाक या व्यक्तीने याह्या हा "शहीद' झाल्याचे सांगितले. मात्र याह्या हा कसा वा कुठे ठार झाला, यासंदर्भातील माहिती देण्यात आली नाही.

याआधी सुमारे पंधरवड्यापूर्वी मुर्शिद मुहम्मद हा अन्य एका भारतीय तरुण अफगाणिस्तानच्या भूमीवर लढताना मरण पावला होता.

Web Title: Indian killed in US attack