हा माणूस डोनाल्ड ट्रम्पची रोज पूजा करतो

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

तेलंगणा - देवी, देवतांची किंवा आपल्या आध्यात्मिक गुरुंची पूजा करणारे तुम्ही अनेक जण पाहिले असतील. परंतु, तेलगंणातील एका शेतकऱ्याने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांचा फोटो देवघरात ठेवला आहे. तसेच तो रोज या फोटोची मनोभावे पूजा देखील करतो. बुसा कृष्णा असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत कृष्णा यांच्याशी संवाद साधला असता, यामुळे भारतीयांचे प्रेम आणि महानता जगाला कळेल असे त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. अमेरिकेत श्रीनिवास कुचिभोटला या इंजिनिअरची हत्या झाल्याच्या घटनेचा आपल्यावर मोठा परिणाम झाल्याचे कृष्णा यांनी सांगितले. त्यानंतरच त्यांनी ट्रम्प यांची पूजा करण्यास सुरुवात केली. आपण पूजा करत असल्याचे ट्रम्प यांना एक दिवस नक्की कळेल आणि त्यांना भारतियांच्या प्रेमाची प्रचिती येईल. असा विश्वास कृष्णा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भविष्यात कृष्णा यांना ट्रम्प यांचे मंदिर देखील बांधायचे आहे.

विशेष म्हणजे कृष्णा यांना ट्रम्प यांच्याविषयी फारशी माहिती नाही. 

Web Title: Indian Man Prays to Photo of Donald Trump Every Day