पाच राज्यांतील अपयशाचा काँग्रेसला फटका; सदस्यनोंदणी मोहिमेवर परिणाम

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा काँग्रेसच्या सदस्यनोंदणी मोहिमेलाही फटका बसला आहे.
Congress
Congressesakal

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा काँग्रेसच्या सदस्यनोंदणी मोहिमेलाही फटका बसला आहे. महाराष्ट्रात ३० लाखाचे उद्दिष्ट असताना केवळ साडे सहा लाखापर्यंतच प्राथमिक सदस्य नोंदणी झाल्याचे कळते. याची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याचे समजते.

काँग्रेस संघटनात्मक निवडणुकीबाबत शनिवारी सर्व सरचिटणीस, प्रभारींच्या बैठकीत प्रामुख्याने याबाबत मध्ये सदस्यनोंदणीबाबत चर्चा झाली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बोलावलेल्या बैठकीला उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.

प्रभारींनी सदस्यनोंदणीचा अहवाल दिला असून या मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने किती नवे सदस्य जोडले हा आकडा नंतर लगेच देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्रतिसाद थंड असल्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सादर केलेल्या अहवालातून आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com